धर्मवीर छत्रपती संभाजी महारांजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येत आहे. शिवरायांच्या चित्रपटांची मालिका संपल्यानंतर आता संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
चित्रपटाचं शुटींग पुर्ण झालं असून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा पहिलाच सिनेमा आहे. या चित्रपटाचे नाव 'शिवरायांचा छावा'असे असणार आहे. या चित्रपटात नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी लोकशाहीला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे.