Siddharth & Kiara Lokshahi Team
मनोरंजन

चर्चेला उधाण; कियारा अन सिद्धार्थ पुन्हा एकत्र

ब्रेकअपनंतर कियारा आणि सिद्धार्थ पुन्हा एकत्र आले....

Published by : prashantpawar1

बॉलिवूडमध्ये याआधी देखील कियारा अडवाणी (kiara adwani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा(siddharth malhotra)या दोघांच्या ब्रेकअपची अफवा पसरली होती. परंतु ती चुकीची सिद्ध करत दोघेही पुन्हा एकत्र दिसले आहेत. दरम्यान दोघांमध्ये कटुता दिसली नाही. कियाराने 'फगली' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी',' कबीर सिंग' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने आपली जबाबदारी चोखपणे पार पडली आहे. आणि तिच्या करिअरला देखील इथूनच सुरुवात झाली होती.

कियारा अडवाणी सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या हिटलिस्टमध्ये नामांकित आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'भूल भुलैया 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कियारा मुख्य भूमिकेत आहे. कियाराचा आगामी चित्रपट 'जुग जुग जिओ'चा ट्रेलरही लाँच झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान कियराला पत्रकाराने प्रश्न विचारला की ती सिद्धार्थ सोबत लग्न करून सेटल होणार आहे का ? कियाराने या प्रश्नाचे उत्तर देण्याआधीच चित्रपटाचा निर्माता करण जोहर(karan johar) मध्येच उडी मारून म्हणाला की तू माझ्या लग्नाबद्दल कधी विचारलं नाहीस. मी 50 वर्षांचा होणार आहे. तुला काय वाटतं मी लग्नासाठी पात्र नाही? या हास्यानंतर कियाराने या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की तिला लग्नाच्या टॅगची गरज नाही.

कियारा म्हणाली की मी लग्न न करताही समाधानाने राहू शकते . मी सध्या माझ्या कामावर पूर्ण वेळ देत आहे. माझ्या आयुष्यात मला सध्या कोणाच्याच मदतीची गरज नाही. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. कियाराचे नाव सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडले गेले. दोघेही त्यांच्या केमेस्ट्रीबद्दल नेहमीच चाहत्यांमध्ये बहुचर्चित असतात. ते दोघे कधीच आपल्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलले नाहीत. शेरशाह या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री चांगलीच नावाजली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."