Drishyam 2 Team Lokshahi
मनोरंजन

‘दृश्यम २’ची बॉक्स ऑफिसवर कमाल; 100 कोटींच्या जवळ

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धमाकुळ घालत आहे.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धमाकुळ घालत आहे. २०१४ मध्ये ‘दृश्यम’ सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. आता ‘दृश्यम २’ या सिनेमालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता हा सिनेमा रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात १०० कोटी आकडा गाठताना दिसत आहे.

‘दृश्यम २’ या सिनेमाने सोमवारी १० कोटींची कमाई केली आहे. तर या सिनेमाने मंगळवारी 11 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने ८७.०१ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करताना दिसत आहे.

‘दृश्यम २’ चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता आणि मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडके दिसत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा