Alia Bhatt-Ranbir Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Alia Bhatt Pregnancy: कंडोम Durex ची आलिया-रणबीरसाठी फनी पोस्ट

आलियाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोघांसाठी शुभेच्छांचा पाऊस पडला. यासोबतच चाहत्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सही सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याला शुभेच्छा संदेश पाठवत आहेत.

Published by : Team Lokshahi

आलियाने हॉस्पिटलमधील अल्ट्रासाऊंडच्या छायाचित्रासह तिच्या गरोदरपणाची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. आलियाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोघांसाठी शुभेच्छांचा पाऊस पडला. यासोबतच चाहत्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सही सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याला शुभेच्छा संदेश पाठवत आहेत. दरम्यान, ड्युरेक्स कंडोम कंपनीने रणबीर-आलियाचे अभिनंदन करणारी एक मनोरंजक पोस्ट शेअर केली आहे.

ड्यूरेक्स इंडियाने अपने सोशल अकाउंटवर आलिया-रणबीर यांचे अभिनंदन करत म्हटले की, “द जोमो इज रियल! बधाई हो आलिया और रणबीर.” हालांकि पोस्ट की नोट में लिखा है- ‘महफिल में तेरी, हम तो क्लियरली नहीं थे. बधाई” . रणबीर याचा सुपरहिट चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’ मधील गाणे ‘चन्ना मेरेया’ चे आहे. त्याचा Durex कंडोम ब्रॅण्डने चांगला वापर केला आहे.

लग्नाच्या निमित्ताने फनी पोस्टही केली होती

रणबीर-आलियाच्या लग्नाच्या निमित्ताने ड्युरेक्सने अभिनंदनाचा संदेश देणारी पोस्ट शेअर केली होती. त्यादरम्यान ड्युरेक्सने रणबीर कपूरच्या चन्ना मेरे या या प्रसिद्ध गाण्याचा संदर्भ देत पोस्टमध्ये लिहिले, 'डियर रणबीर और आलिया, मेहफिल में तेरी हम ना रहे जो, फन तो नहीं है.'

आलियाची प्रेग्नेंसीची पोस्ट...

आलिया भट्टची प्रेग्नेंसीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलियाने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली दिसत आहे. त्याची सोनोग्राफी होत आहे. संगणकाच्या स्क्रीनवर ब्लर करून हार्ट इमोजी तयार करण्यात आले आहेत. बाळाला पडद्यावर पाहिल्यानंतर आलियाच्या आनंदाला पारावार उरला नाही. आलियाच्या जवळही कोणीतरी बसले आहे. त्याची पाठ दिसते. आलियाच्या शेजारी बसलेली व्यक्ती कोण आहे हे स्पष्ट झाले नसले तरी तो रणबीर कपूरसारखा दिसत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावळं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका