मनोरंजन

एतशा संझगिरी साकारणार ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’

Published by : Lokshahi News

पुण्यश्लोक अहिल्याबाई ही मालिका खूपच गाजत असून आता या मालिकेला नव वळण येणार आहे.या मालिकेने सात वर्षांची लीप घेतली असून अहिल्याबाईंच्या जीवनातल्या महत्वाच्या भागांचे एपिसोड दाखविले जाणार आहेत.समाजातील अनिष्ट रूढींवर विजय मिळवत अहिल्याबाईंची पुढील वाटचाल या मालिकेतून दिसणार आहे.

लोकप्रिय अभिनेत्री एतशा संझगिरी तरुण अहिल्याबाई होळकरांची भूमिका साकारणार आहे. या मालिकेसाठी निवड झाल्याचा आपला आनंद व्यक्त करताना एतशा संझगिरी म्हणाली, "भारतीय इतिहासातील एक अत्यंत महान महिला असलेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांचा वारसा प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य मानते. मला आशा आहे की, या प्रेरणामूर्ती असलेल्या स्त्रीचे चरित्र पडद्यावर उलगडून दाखवण्यात मी यशस्वी होईन आणि प्रेक्षक माझ्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा असाच वर्षाव करत राहतील. ही नवीन वाटचाल सुरू करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे."असं एतशाने सांगितलं.

मालिकेत लहानग्या अहिल्याला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर आता मोठ्या झालेल्या अहिल्येला पाहणं उत्सुकचेचं असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?