Faisal & Muskan Lokshahi Team
मनोरंजन

Faisal Khan : फैसलने फेटाळले 'ते' आरोप

फैसल खान मॉडेल मुस्कान कटारियाला हिला डेट करत होता.

Published by : prashantpawar1

फैसल खान (Faisal Khan) मॉडेल मुस्कान कटारियाला (Muskan Katariya) हिला डेट करत होता. दोघांनीही 'नच बलिये 9' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. मात्र शोमधून बाहेर आल्यानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार मुस्कान कटारियाने फैसल खानवर फसवणुकीचा आरोप केला होता. फैजल खानही त्या आरोपांना फेटाळत बाहेर पडला होता. फैजल खानने दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले की पूर्वीच्या नात्यात आलेली कटूता, अनुभव आणि लोकांनी ज्याप्रकारे चिखलफेक केली होती त्यानंतर त्याच्याकडे प्रेमासाठी वेळ नव्हता. फैजल खानने सांगितले की तो सध्या सिंगल आहे आणि कोणाला डेट करत नाही.

फैजल खानचे वडील ऑटो रिक्षा चालवतात. फैजल प्रसिद्धीच्या झोतात जेव्हा आला तो स्पर्धक बनला आणि डान्स इंडिया डान्स लिल मास्टर्स 2 मध्ये भाग घेतला. त्यावेळी तो अगदी 15 वर्षांचा होता. फैजलने हा शो जिंकला आणि धुमाकूळ घातला. यानंतर त्याने 'भारत का वीर पुत्र

महाराणा प्रताप' या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2016 मध्ये फैजल खानने 'प्रेम कहानी' या मराठी चित्रपटातही काम केले होते. 2019 मध्ये तो 'मोदी जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' नावाच्या वेब सीरिजमध्ये तरुण नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी