प्रसिद्ध दाक्षिणात्य आर जे रचना (RJ Rachana) यांचा मंगळवारी (22 फेब्रुवारी) कार्डियक अरेस्टने निधन झाले आहे. रचना हिने वयाच्या 39 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रचना यांनी रेडिओ मिर्ची या रेडिओ चॅनेलच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन करायची. आर जे रचना (RJ Rachana) हिचे वक्तृत्व कौशल्य आणि विनोदी शैलीनी तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
रचनाने सिंपलगी ओंडू ( Simple Agi Ondh Love Story) या चित्रपटात काम केले होते. तसेच रचना ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असायची. रचनाची 'पोरी टपोरी रचना',('Pori Tapori Rachana) अशीओळख होती.
आर जे प्रदीप यांनी रचनाचा फोटो सोशल मीडियावर (social media) फोटो शेअर करून तिला श्रद्धांजली वाहिली आहे, 'रचना तुमच्या आत्म्याला शांती लाभो.' त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. आर. जे आणि अभिनेत्री सुजाता अक्षयाने रचनाचे फोटो पोस्ट करून त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाहिये की रचना आपल्या सर्वांना सोडून गेली आहे. ओम शांती.'