Govinda
Govinda Team Lokshahi
मनोरंजन

Govinda : गोविंदाचे लव्ह-लाईफ किस्से उघड...

Published by : prashantpawar1

नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा (Govinda) याने बॉलिवूडमध्ये आपल्या विनोदी आणि उत्कृष्ट नृत्य कौशल्याने चित्रपट जगतात आपली छाप पाडली आहे. नव्वदीच्या काळात त्यांनी ज्या चित्रपटात काम केले होते तो प्रत्येक चित्रपट हिट झाला. चाहत्यांना आजही गोविंदाचे चित्रपट पहायला खूप आवडतात. एक वेळ अशी होती की गोविंदाचे चाहते त्याच्या एका झलकसाठी काहीही करायला तयार असत. गोविंदाची मोहिनी केवळ चाहत्यांवरच नाही तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या स्टार्सवरही पाहायला मिळाली. मात्र राणी मुखर्जी (Rani Mukharji) हिच्या जवळीकीने त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण केल्या होत्या. गोविंदा सध्या सुखी व वैवाहिक जीवन जगत आहे. परंतु सुमारे 22 वर्षांपूर्वी त्याचे वैवाहिक जीवन अडचणीत आले होते. असे काहीसे घडले की 2000 साली गोविंदा आणि राणी मुखर्जी 'हद कर दी आपने' या चित्रपटात एकत्र काम करत होते. त्यादरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

बॉलीवूडमध्ये त्यांच्या अफेअरच्या बातम्या सामान्य होऊ लागल्या. गोविंदाच्याअफेअरची बातमी पत्नी सुनीता हिलाही माहिती असल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. ही बाब समजल्यानंतर गोविंदाच्या आयुष्यात मोठा भूकंप झाला. आपले वैवाहिक जीवन वाचवण्यासाठी गोविंदाने राणी मुखर्जीपासून वेगळे राहणे योग्य मानले. मीडिया रिपोर्ट्सनुसार राणी मुखर्जीशिवाय गोविंदाचे नाव रवीना टंडनसोबतही जोडले गेले होते. परंतु त्यांचे अफेअर फार काळ चालू शकले नव्हते. चित्रपट प्रवास गोविंदाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत.

यामध्ये पार्टनर, कुली नंबर वन, शोला और शबनम, राजा बाबू, हसीना मान जायेगी आणि भागम भाग या चित्रपटांचा समावेश आहे. सध्या गोविंदा आपल्या पत्नीसोबत आपले वयक्तिक आयुष्य आनंदाने जगत आहे. आजकाल गोविंदा देखील आपल्या अल्बममध्ये व्यस्त आहे आणि त्याने अनेक गाणी रिलीज केली आहेत.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा