Sonali Bendre Team Lokshahi
मनोरंजन

सोनाली बेंद्रेचा पाहिलाय का नवा लुक; सोळा वर्षांपूर्वीचा घातलाय तिने सूट

फोटो शेअर करत सोनालीने दिली माहिती.....

Published by : prashantpawar1

बॉलिवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे(sonali bendre) यांचा अभिनय आजही असंख्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडणारी एक सुंदर अशी अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रे या अभिनेत्रीची ओळख होती. अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने असंख्य मनांना भुरळ घालणारी ती एक सौंदर्य संपन्न अशी अभिनेत्री होती.

काही वर्षांपूर्वी सोनाली कॅन्सरच्या आजाराने अगदी त्रस्त झालेली होती. मात्र सध्या ती या आजारातून पूर्णपणे मुक्त झालेली आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) काही ना काही शेअर करत चर्चित असते. आपल्या वयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी देखील ती आपल्या चाहत्यांना शेअर करत असते. तिने सोशल मीडियावर एक फोटो (Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनालीने 16 वर्षांपूर्वीचा एक सूट घातलेला आहे. पांढऱ्या रंगाच्या या सूट मध्ये ती अगदी सुंदर दिसत आहे. ती म्हणते की सगळं काही बदलत असताना काही गोष्टी मात्र अजूनही जशाच्या तशाच आहेत. अगदी याच गोष्टीचा विचार करत मी सोळा वर्षांपूर्वीचा हा सूट घातलेला आहे असे देखील तिने म्हटलेलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा