बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) नुकताचं रिलीज झालेल्या 'आश्रम 3' या वेबसिरीजमध्ये पाहिली होती. यामध्ये ती बॉबी देओल (बॉबी देओल) यांसोबत अनेक बोल्ड सीन्स करताना दिसली होती. सोशल मीडियापासून स्क्रीनपर्यंत ईशाचा हॉटनेस पाहायला मिळतो. आणि ती तिच्या स्टाईलने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेते. अल्पावधीतच ईशाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की 'मला वाढत्या वयातही हॉटनेसचे आकर्षण स्विकारायचे आहे. 'ईशा म्हणते की जेव्हा लोक मला 'हॉट' म्हणत अशी प्रतिक्रिया देतात तेव्हा मला खूप मस्त वाटतं. सोशल मीडियावर मला फॉलो करणारे माझे काही मित्र प्रतिक्रिया देताना सांगतात की तू दिवसेंदिवस हॉट दिसत आहेस.
36 वर्षीय ईशाने पुढे असेही सांगितलं की, तिचे सध्याचे वय हे सर्वात सुंदर वय आहे. मोनिका बेलुची आणि रेखा यांचे उदाहरण देताना ती म्हणते 'मोनिका बेलुची (Monica Bellucci) जी 57 वर्षांची आहे तरी देखील ती तिच्या लूकने लोकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत असते. त्याचप्रमाणे रेखाजीही आहेत. या वयात लोक त्यांना पाहण्यासाठी उत्सुक असतात. आपण त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. मला त्यांच्यासारखंच घडवायचं आहे हे मला कळून चुकलं आहे. दिवसेंदिवस हॉट होत असताना वाढत्या वयात वृद्धत्व हे मलाही स्वीकारावे लागेल.
ईशा गुप्ताने जन्नत 2, राज 3 आणि रुस्तम सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ज्यामध्ये तिने तिच्या ग्लॅमरस आणि हॉटनेसने पडद्यावर आग लावली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आश्रम 3' (Ashram 3) या वेबसिरीजमध्येही तिने खूप बोल्ड सीन्स दिले होते. सोशल मीडियावरही ईशा तिच्या सिझलिंग लूकने नेटकर्यांचे आकर्षण वाढवत असते.