मनोरंजन

जॅकलिनच्या अडचणीत वाढ; 200 कोटींच्या गैरव्यवहारात ईडीने केले आरोपी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणात ईडीने अभिनेत्रीला आरोपी बनवले आहे. यासंबंधी आज ईडी आरोपपत्र दाखल करणार आहे. यामुळे जॅकलिनच्या विदेश प्रवासावरही बंदी आली आहे.

जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखर सोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती अडचणीत सापडली आहे. अशातच सुकेश चंद्रशेखर याने केलेल्या २०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस आरोपी करण्यात आले आहे. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिस हिला आरोपी करण्यात आले आहे. न्यायालयानं अद्याप आरोपपत्रावर सुनावणी सुरु केली नसल्यानं तिला लगेच अटक होण्याची शक्यता नाही. परंतु, तिला आता विदेशात जाता येणार नाही. सुकेश चंद्रशेखर तुरुंगात असताना जॅकलिननं त्याच्याशी संवाद साधला होता, असाही आरोप ईडीनं केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलीनला 10 कोटी रुपयांच्या मौल्यवान भेटवस्तू दिल्या. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबियांनाही महागड्या भेटवस्तूही दिल्याचे सांगण्यात येते. कुटुंबाला दिलेल्या भेटवस्तूंमध्ये कार याशिवाय 1.32 कोटी आणि 15 लाख रुपयांचा समावेश आहे. याप्रकरणी ईडीने अभिनेत्रीची 7 कोटींहून अधिकची संपत्तीही जप्त केली आहे. यानंतर जॅकलिन बऱ्याच दिवसांपासून ईडीच्या रडारवर होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ईडीने जॅकलिनला आरोपी म्हणून ठेवले आहे.

काय आहे प्रकरण?

सुकेश चंद्रशेखरने दिल्लीतील तुरुंगात असताना एका महिलेची 200 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. यानंतर सुकेशने याच खंडणीच्या पैशातून जॅकलिनला कोटींच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. भेटवस्तूंमध्ये हिरे, दागिने, 52 लाख किमतीचा घोडा यासह इतर अनेक महागड्या भेटवस्तूंचा समावेश आहे. सुकेशने लोकांना फसवून हे सर्व पैसे कमावल्याचे सांगण्यात येते.

तर, दुसरीकडे जॅकलिनचे अनेक चित्रपट लाईनमध्ये आहेत. यामध्ये अभिनेत्रीचे दोन चित्रपट बिग बजेटचे आहेत. राम सेतूमध्ये जॅकलिन अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे बजेट 80 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय जॅकलीन रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात जॅकलिनसोबत रणवीर सिंग आणि पूजा हेगडे स्क्रिन शेअर करणार आहेत.

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...