मनोरंजन

‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटातील ‘जय भवानी जय शिवराय’ ! गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि हे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. अशाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे, ‘गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि हे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. अशाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे, ‘गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep Teaser )असं या चित्रपटाचं नाव आहे.

नुकतेच या चित्रपटातील ‘जय भवानी जय शिवराय’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली. या गाण्यामध्ये अमोल कोल्हे यांची झलक पाहायला मिळत आहे. “गणेशोत्सवाची गणेशभक्तांना शिवशक्तीमय भेट…सादर आहे शिवप्रताप गरुडझेप या आगामी चित्रपटातील ‘जय भवानी जय शिवराय’ गाणे!” असं अमोल कोल्हे यांनी गाणं शेअर करत कॅप्शन दिलं आहे.

जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. सप्टेंबर २०२२मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा