Ranveer singh & Shalini Pandey Team Lokshahi
मनोरंजन

'जयेशभाई जोरदार’ चित्रपटात काम करणारी अभिनेत्री घरुन पळून गेली होती

अभिनेत्री शालिनी पांडेने तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी उघड केली.

Published by : Rajshree Shilare

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) स्त्री भ्रूणहत्येवर (Female Foeticide) चित्रपट घेऊन येत आहे. ‘जयेशभाई जोरदार’ (Jayeshbhai Jordaar ) हा चित्रपट 13 मे 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या चित्रपटात अभिनेत्री शालिनी पांडे (Shalini Pandey) रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

Jayeshbhai Jordaar scene

शालिनी पांडेचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. शालिनी पांडेला खरी प्रसिद्धी विजय देवराकोंडा (Vijay Devarakonda) यांच्या ‘अर्जुन रेड्डी’ (Arjun Reddy) या चित्रपटातून मिळाली.याशिवाय ती तेलुगु चित्रपट आणि Zee5 च्या हिंदी चित्रपट 'बमफड' (Bamfaad) मध्ये देखील दिसली आहे.

ट्रेलर लॉन्च इव्हेंट दरम्यान,शालिनीने सांगितले की, तिच्यासाठी अभिनेत्री बनणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी तिला घरातून पळून जावे लागल्याचा खुलासा मीडियासमोर केला.

Shalini pandey

तिच्या वडिलांची इच्छा होती की तिने इंजिनीअरिंग करावी. शालिनीने सांगितले की, तिने तिच्या वडिलांना हे पटवून दिले की तिला जवळपास चार वर्षे अभिनय करायचा आहे. पण वडिलांना ते मान्य नव्हते. शेवटी, शालिनीने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतेला. शालिनीने सांगितले की, आता तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावरील नाराजी दूर केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा