Kapil Sharma Team Lokshahi
मनोरंजन

Kapil Sharma : मला ट्विटरपासून दूरच राहू द्या , कपिलने जोडले हात...

कपिलला बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल विचारले असता त्याने हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

Published by : prashantpawar1

बहिष्काराच्या ट्रेंडमुळे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारत आहेत. त्यामुळेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत आहेत. आता या प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यांची प्रतिक्रियाही समोर आलेली आहे. खरं तर 22 ऑगस्ट रोजी कपिल बेटी फॅशन शोचा शो-स्टॉपर बनला. यावेळी कपिलला बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल विचारले असता त्याने हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने टाळण्याचा प्रयत्न केला.

बहिष्काराच्या ट्रेंडमुळे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारत आहेत. त्यामुळेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत आहेत. आता या प्रकरणावर कॉमेडियन कपिल शर्माची प्रतिक्रियाही समोर आली आहे. खरं तर 22 ऑगस्ट रोजी कपिल बेटी फॅशन शोचा शो-स्टॉपर बनला. जिथं कॉमेडियन पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसला. यावेळी कपिलला बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल विचारले असता त्याने हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने टाळण्याचा प्रयत्न केला.

1. कपिल म्हणाला मला twitter पासून लांब ठेवा
या मुद्द्यावर कपिलला प्रश्न विचारला असता तो म्हणाला की 'अरे यार प्लीज' मला या सर्व गोष्टींमध्ये ओढू नका. मी मोठ्या संकटात ट्विटरच्या दुनियेतून बाहेर पडलोय. मला यापासून दूर राहू द्या. ट्विटरवर काय चालले आहे ते मला माहित नाही.

2. कपिलने सांगितले की हा ट्रेंड तात्पुरता आहे
कपिलने बहिष्काराचा ट्रेंड मागे घेतला आणि म्हटले की तो इतका बौद्धिक व्यक्ती नाही. सध्या त्याचा एकही चित्रपट येत नाहीये. असे ट्रेंड येतच राहतात ही फक्त काळाची बाब आहे.

3. रक्षाबंधनाच्या बहिष्कारावर कपिल म्हणाला
अक्षय कुमार हा कपिल शर्माचा जवळचा मित्र आहे. जेव्हा पिंकविलाच्या रिपोर्टरने त्याला रक्षाबंधन या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबद्दल विचारले तेव्हा कॉमेडियन म्हणाला की 'मी त्याच्या कोणत्याही चित्रपटावर बहिष्कार टाकल्याचं ऐकलेलं नाही. कृपया मला twitter पासून दूरच राहुद्या.

4. कपिल शर्मा शोचा नवीन सीझन सुरू होतोय
कपिल शर्मा शोच्या नव्या सीझनचं शूटिंग सुरू झालेलं आहे. अशा परिस्थितीत कपिलने आपला नवा लूक उघड केला आहे. जे पाहून चाहत्यांना नवीन सीझनची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय पाहुणे म्हणून दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं