Maa Kali Smoking Cigarette Team Lokshahi
मनोरंजन

‘Kaali’ Smoking Film Poster: डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवर माँ कालीच्या हातात Cigarette! नेटकरी संतापले, निर्मात्यांच्या अटकेची मागणी

चित्रपट निर्माती, कवयित्री लीना मनिमेकलाई यांच्या अपकमिंग डॉक्युमेंट्री फिल्मच्या पोस्टरमध्ये माँ कालीच्या हातात Cigarette तर दुसऱ्या हातात LGBTQ चा झेंडा दाखवण्यात आला आहे.

Published by : Vikrant Shinde

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये, कलाकृतींमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात असा आरोप सातत्यानं केला जात असतो. हा आरोप अगदी आमिर खानच्या (Aamir Khan) पी.के. (PK) या चित्रपटापासून ते रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) अपकमिंग फिल्म ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटापर्यंत चित्रपटांवर टीका झाली आहे. आता चित्रपट निर्माती लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्टर शेअर केलं आहे.

या पोस्टरमध्ये माँ काली (Maa Kali) च्या हातात सिगारेट दिसत आहे तर, दुसऱ्या हातात LGBTQ चा झेंडा आहे. तर, या पोस्टरमुळे सोशल मीडियावर ती लीना प्रचंड ट्रोल होत असून तिच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. तर, सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिच्या अटकेचीही मागणी केली जात आहे.

काय आहे ट्विट?

माझ्या नव्याने येऊ घातलेल्या माहितीपटाचं पोस्टर शेअर करताना मला फार आनंद होत आहे. माझा हा माहितीपट "रिदम ऑफ कॅनडा" या कॅनडामधील फिल्म फेस्टिव्हलमध्ये लाँच करण्यात आला आहे. असं लिहीत तिने पोसेटर शेअर केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा