Malaika Arora, Arjun Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

मलायका 12 वर्षाने लहान अर्जुन कपूर सोबत करणार लग्न

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 2022 च्या अखेरीस लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्याचे हे लग्न इंटिमेट वेडिंग असेल.

सूत्रांच्या माहितीनुसार , दोघेही या वर्षीच्या हिवाळ्यात लग्नाची योजना आखत आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत दोघे लग्न करणार आहेत. तसेच रजिस्टर पध्दतीन् हे लग्न होणार आहे. या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे लोकच सहभागी होणार आहेत.

रिपोर्ट्सनुसार, मलायका आणि अर्जुन त्यांच्या लग्नाच्या ड्रेसवर जास्त खर्च करणार नाहीत. मलायका लग्नात साधी साडी नेसणार आहे, तर अर्जुन कुर्ता पायजमामध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर लग्नाच्या पार्टीत दोघेही वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसले.

अर्जुन आणि मलायका अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुनने 2019 मध्ये सोशल मीडिया पोस्टवर त्याच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. मलायकाने अभिनेता, निर्माता म्हणून इंडस्ट्रीत काम केले आहे. अभिनेता अरबाज खानपासून (Arbaaz Khan) घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाचे हे दुसरे लग्न असेल. त्यांना एक मुलगा असून तो १९ वर्षांचा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा