जानी दुश्मन फेम बॉलिवुड अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर एनसीबीने छापा टाकला आहे. सध्या अभिनेत्याची चौकशी सुरु आहे. या छाप्यात नेमके काय जप्त करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे.
अभिनेता अरमान कोहलीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. त्या कारवाईतून पोलिसांना काही वस्तु सापडल्या आहेत. ज्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे. सध्या अभिनेत्याची चौकशी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात एनसीबीकडून कारवाई होताना दिसत आहे. त्यात आतापर्यत अनेकांना अटकही करण्यात आली आहे.
कलाकारांवर एनसीबीनं वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. टीव्ही अभिनेता गौरव दीक्षित याच्यावर कारवाई करुन त्याला एनसीबीनं अटक केली होती. त्याला 30 ऑगस्टपर्यत एनसीबीच्या कोठ़डीत ठेवण्यात येणार आहे.