Jugjugg Jeeyo Team Lokshahi
मनोरंजन

Jugjugg Jeeyo : नच पंजाबन गाण्यावर नीतू कपूर आणि मनीष मल्होत्राने धरला ठेका

'जुग जुग जिओ' हा चित्रपट 24 जूनला चित्रपटगृहामध्ये होणार प्रदर्शित आहे.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूडमध्ये सध्या एक गाण खूप गाजते आहे. ते म्हणजे 'जुग जुग जिओ' (Jugjugg Jeeyo) या चित्रपटामधील 'नच पंजाबन' (Nach Punjaban) हे गाणं चाहत्यांना खूप आवडल आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही खूप धमाकेदार आहे. या चित्रपटामध्ये वरूण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर (Anil Kapoor) हे मुख्य भुमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

'नच पंजाबन' या गाण्यावर चाहत्यांबरोबर सेलेब्रिटीही रिल्स बनवताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्री नीतू कपूरने (Neetu Kapoor) स्वतः तिची मुलगी रिद्धिमा (Riddhima) आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत (Manish Malhotra) यांनीही या गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनीही खूप पसंती दिली आहे. या आगामी 'जुग जुग जिओ' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 24 जूनला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

'जुग जुग जिओ' हा चित्रपट बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस धर्मामध्ये शुटींग करण्यात आली आहे. तर हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शित राज मेहता हे करत आहेत. या चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर हे वरुण धवनच्या आई-वडिलांच्या भूमिका साकारणार आहेत. तसेच कियारा अडवाणी या चित्रपटात त्याच्या सूनेची भूमिका साकारणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू