Pankaj Tripathi Team Lokshahi
मनोरंजन

Pankaj Tripathi : मिर्झापुर 3 बद्दल काही गुपित गोष्टी उघड...

मुलाखतीदरम्यान अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी सांगितल्या काही गोष्टी....

Published by : prashantpawar1

'मिर्झापूर' (Mirzapur) ही अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजमध्ये गणली जाते. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), दिव्येंदू शर्मा (Divyendu Sharma) आणि अली फजल (Ali Fazal) स्टार या वेब सिरीजचे 2 सीझन आत्तापर्यंत आले आहेत आणि आता चाहते या सिरीजच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूर सीझन 3 चे कथानक तिथून सुरू होईल जिथून आधीच्या सीझनची कहाणी संपली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार कालेन भैयाची भूमिका साकारणारा अभिनेता पंकज त्रिपाठीने मिर्झापूर 3 साठी वेशभूषा करून पाहण्यास सुरुवात केली आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की सध्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मागील सीझनच्या शेवटी गुड्डू भैया (अली फजल) मिर्झापूरच्या खुर्चीवर बसला होता.

मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा) आणि कलेन भैया (पंकज त्रिपाठी) जखमी झाल्यानंतर कारमधून पळताना दाखवले आहेत. पंकज त्रिपाठीची मुलाखतीदरम्यान काही गोष्टी उघड झाल्या आहेत. मिर्झापूर सीझन 3 (Mirzapur Season 3) च्या कथेबद्दल एक मोठा इशारा देऊन त्यांनी चाहत्यांसाठी कथेचं एक मोठं रहस्य उघड केलय असं देखील बोललं जात होतं परंतु असं काहीही नाही. या मालिकेच्या कथेबाबत निर्माते आणि कलाकारांनी पूर्ण गोपनीयता पाळली असून कथानक पुढे काय वळण घेईल हे मिर्झापूर-३ प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पंकज त्रिपाठी यांच्याकडे सध्या भरपूर सारे प्रोजेक्ट आहेत. मालिकेच्या शेवटच्या 2 सीझनचे डायलॉग सुपरहिट झाले आहेत आणि प्रत्येक पात्राची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा