Pooja Hegde Team Lokshahi
मनोरंजन

Pooja Hegde : इंडिगोच्या कर्मचाऱ्याकडून मिळाली चुकीची वागणूक, ट्विट करून दिली माहिती

सध्या बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे हिचं ट्विट चर्चेत आहे.

Published by : shamal ghanekar

सध्या बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिचं ट्विट चर्चेत आहे. पूजा तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्याने कामानिमित्ताने जगभर प्रवास करत असते. पूजा मुंबईहून विमाने प्रवास करत असताना तिला विमान कर्मचाऱ्याकडून चुकीची वागणूक मिळाली आहे. तिने याबद्दलच ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

पूजा हेगडेंने केलेल्या ट्विटमध्ये म्हणाली की, इंडिगोचा कर्मचारी विपुल नकाशे यांनी आम्हाला अगदी वाईट वागणूक दिली. कोणतेही कारण नसातानाही तो उद्धटपणे आणि धमकीच्या स्वरात आमच्याशी बोलत होता. या गोष्टीमुळे मी दु:खी आहे. असे ट्विट तिने केले आहे. हा सगळा घडलेला प्रकार पूजाने ट्विट (Twitter) करत सांगितला आहे.

पूजा हेगडे हिने केलेले हे ट्विट पाहून इंडिगो एअरलाइन्सने (IndiGo Airline) अभिनेत्री पूजाची माफी मागितली आहे. त्यानंतर इंडिगोने ट्विट करत म्हणाले की, “तुमच्याबरोबर घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. तुमची संपूर्ण माहिती आम्हाला मॅसेजच्या माध्यमातून पाठवा. लगेचच आम्ही तुमच्याशी संवाद साधू.”

पूजाने केलेल्या ट्विटनंतर अनेकांनी यावर त्यांची प्रतिक्रिया माडली आहे. ते म्हणाले की, विपुलने फक्त पूजालाच नव्हे तर इतर प्रवाशांनाही चुकीची वागणूक देत होते.

‘सर्कस’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ या अगामी चित्रपटातून पूजा हेगडे ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा