Prajakta Mali
Prajakta Mali Team Lokshahi
मनोरंजन

Prajakta Mali : प्राजक्ताला कशी लागली मसाला गुटखा खायची सवय

Published by : shweta walge

अभिनेत्री (Prajakta Mali) प्राजक्ता माळी ‘रानबाजार’ (Raanbaazaar) या वेबसीरिजच्या (Webseries) माध्यमातून एका बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर आली. तीच्या या वेबसीरिजमधील भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. कलाकारांना अनेकदा भूमिका आत्मसात करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. अश्याच प्रकारे प्राजक्ता माळीने या भूमिकेसाठी तिने नक्की काय कष्ट घेतले माहित आहे का?

प्राजक्ताने ‘रानबाजार’ वेबसीरिजसाठी शरीरापासून ते अभिनयापर्यंत अनेक गोष्टींवर काम केलं आहे. रत्ना या भूमिकेसाठी प्राजक्ताने तब्ब्ल सात-आठ किलो वजन वाढवलं होतं. या वेबसीरिजमध्ये वेश्यांची (prostitute) भूमिका साकारत असल्याने त्यासारखी चाल, बोलणं यावर सुद्धा तिने बरच काम केलं. या वेबसिरीजमध्ये रत्ना या भूमिकेला व्यसन सुद्धा असल्याने गुटखा मसाला खायची तालीम सुद्धा तिने केली.

प्राजक्ताने यासंबंधी (Prajakta Mali) एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे ज्यात तिने अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. रत्नाच्या मेकअपपासून ते अगदी व्यसनी दिसावी यासाठी तिने काय कष्ट घेतले यावर ती गेले अनेकदिवस अपडेट शेअर करत आहे. एका रिसेन्ट पोस्टमध्ये ती म्हणते, “Vanity मध्ये बसून बडीशेप खात मसाला गुटखा वगैरे खातेय असं भासवण्याची practice…

प्राजक्ता आणि तेजस्विनी (Tejaswini) या दोघींना बोल्ड आणि अत्यंत वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी त्यांना भयानक ट्रोल (Troll) केलं गेलं. प्राजक्ताने याआधी अशी भूमिका साकारली नसल्याने तिला नुसत्या ट्रेलर आणि टीजरमधील काही दृश्यांमुळे खूप ट्रोल केलं गेलं.

मात्र वेबसिरीज प्रदर्शित झाल्यावर अनेकांनी समोर येऊन तिला ट्रोल केल्याबद्दल माफी मागितली आणि जाहीरपणे सांगितले की या वेब्सिरिज्मध्ये आक्षेपार्ह काही नाही. प्राजक्ताने साकारलेल्या अनेक भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी तिला आनंदाने स्वीकारलं आहे.

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा