Ranbir & Alia Lokshahi Team
मनोरंजन

रणबीर अन् आलियाचा हटके अंदाज

लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी दोघांनी एकमेकांना वेळ दिला

Published by : prashantpawar1

बॉलिवूडची(Bollywood) सुप्रसिद्ध जोडी आलिया भट्ट(alia bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांच्या लग्नाला जवळपास एक महिना होत आला आहे. या जोडीचा 14 एप्रिल रोजी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नानंतर दोघांचेही कधीही न पाहिलेले फोटो समोर येत होते. या दरम्यान दोघांचा एक व्हिडिओ देखील चर्चित आहे.

णबीर आणि आलिया हे दोघेही लग्न झाल्यापासून आपल्या कामाच्या कमिटमेंट्स (Commitments) पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत दोघांनाही एकत्र वेळ घालवण्याची संधी क्वचितच मिळत होती. मात्र या जोडीने आपल्या लग्नाचा एक महिना पूर्ण होण्याआधी दोघांनीही हा प्रसंग एकमेकांसोबत साजरा केला. रात्री उशिरापर्यंत पार्टीत दोघांनी एकमेकांना वेळ दिला . लग्नानंतर हे स्टार कपल पहिल्यांदाच एका वेगळ्या अंदाजात एकत्र दिसले आहे. या दोघांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रणबीर आणि आलिया अतिशय शानदार लूकमध्ये दिसले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोघेही एकाच गाडीत डिनर डेटवर पोहोचले होते. यादरम्यान आलिया भट्ट वनपीस ड्रेसमध्ये अतिशय कॅज्युअल लूकमध्ये दिसली. मोकळे केस आणि पारदर्शक टाचांसह अलियाचा नाईट(night party) पार्टी लुक तिने तयार केला होता. यासोबतच रणबीर कपूर शर्ट पँट पहिल्या फॉर्मल लूकमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा