Ranbir & Alia Team Lokshahi
मनोरंजन

Ranbir Kapoor : लग्नानंतर रणबीरने केला 'या' गोष्टीचा खुलासा...

रणबीर कपूरने आलिया भट्टसोबत लग्न केल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बनले आहे हे सांगितले.

Published by : prashantpawar1

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhat) हे बॉलिवूडमधील सुंदर कपल्सपैकी एक आहे. प्रदीर्घ अफेअरनंतर दोघांनी 14 एप्रिल रोजी लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या सर्व फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला अजूनही होत आहे. दोघांची प्रेमकहाणी त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली असं म्हटलं जातं. 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. आता रणबीरने लग्नानंतरच्या आयुष्यात झालेल्या बदलांची माहिती शेअर केली आहे.

एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरने आलिया भट्टसोबत लग्न केल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बनले आहे हे सांगितले. रणबीर कपूर म्हणाला सध्या तरी 'इतका मोठा बदल झालेला नाही. आम्ही लग्न करून घ्यावं असं वाटलं म्हणून आम्ही केलं. आमच्याही काही कमिटमेंट्स होत्या. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघेही कामावर पोहोचलो. आलिया तिच्या शूटसाठी निघाली होती आणि मी देखील मनालीला गेलो होतो. जेव्हा ती लंडनहून परत आलो आणि माझा 'शमशेरा' (Shamshera) चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा आम्ही एका आठवड्याची सुट्टी घेण्याचा विचार करत आहोत. आम्ही विवाहित आहोत हे आम्हाला अजूनही वाटत नाही असं देखील रणबीर यावेळी म्हणाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा