Indian idol Marathi winner Team Lokshahi
मनोरंजन

Indian Idol पहिल्या पर्वाचा हा ठरला विजेता

Published by : Team Lokshahi

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे 'इंडियन आयडल मराठी'ला (To Indian Idol Marathi) ओळखले जाते. या रिअ‍ॅलिटी शोने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या रिअ‍ॅलिटी शोची अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा अशी सुंदर टॅगलाईन (Tagline) आहे. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यावेळी या पर्वाचा पहिला विजेता पनवेलचा सागर म्हात्रे ठरला आहे.

सागर म्हात्रे (Sagar Mhatre) याने काही तासांपूर्वी त्याच्या इंन्स्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'इंडियन आयडल मराठी'चा विजेता ठरलेल्या सागर म्हात्रने एक भावूक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सागर म्हणाला की, मला आज 'इंडियन आयडल मराठी'ची ट्रॉफी (Trophy) मिळाली आहे. मी जरी आज जिंकलो असलो तरी इथपर्यंत पोहचण्यासाठी माझ्याबरोबरच्या स्पर्धकांची मला साथ मिळाली. तसेच स्पर्धक मित्रांबरोबर मला अजय-अतुल सर (Ajay-Atul) आणि म्युझियन यांनी सुद्धा तेवढाच पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर जनतेकडून मिळालेले प्रेम याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. असे सागर म्हटले आहे.

'इंडियन आयडल मराठी' या शोमध्ये 14 जण होते. या प्रत्येकाला इंडियन आयडलची ट्रॉपी जिंकण्याची स्वप्न पाहिली होती. पण मी स्वत:ला फार नशिबवान समजतो की, ही ट्रॉपी मी जिंकली. ही ट्रॉपी माझ्या एकट्याची नसून आमच्या सर्वांची आहे. त्यांनी त्याच्या गुरूचेही विशेष आभार मानले. त्याला कैवल्य, अविनाश, शुभम. देवश्री या चौघांनी चांगली साथ दिली,असे सागरने सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा