mangya Team Lokshahi
मनोरंजन

सैराटमधील मंग्या सध्या काय करतोय? जाणून घ्या सविस्तर

Published by : Akash Kukade

मराठीतील सुपरहिट ठरलेला सैराट चित्रपट आणि त्यातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड देखील तोडले. आजही लोक झिंगाट या गाण्यावरती थिरकतांना दिसतात.

चित्रपटात रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) यांनी तर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच या चित्रपटाने नवीन इतिहास रचला असून चित्रपटाचे गाणे आणि डायलॉग खूप गाजले.

यांच्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. याच कलाकारांपैकी एक म्हणजे आर्चीच्या मामाच्या मुलाची भूमिका साकारणारा मंग्या. चित्रपटातील मंग्याची भूमिका धनंजय ननावरे (Dhananjay Nanavare) यांनी साकारली आहे. सैराट चित्रपटानंतर धनंजय ननावरे पुन्हा मालिकेत किंवा चित्रपटात कुठेही झळकला नाही.

त्यानंतर धनंजय सैराटच्या नावानं चांगभलं या शोमध्ये दिसला होता. मंग्या नंतर कुठेच चमकला नाही. त्याचे चाहते त्याला पुन्हा रुपेरी पडद्यावर बघण्यास उत्सुक आहेत. मंग्या सध्या बिकट अवस्थेत जगत आहे. त्याला उपजीविका भागविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

काही वर्षांपूर्वी मंग्या म्हणजेच धनंजय किराणा दुकानात मजुराचे काम करताना दिसला होता. सध्या तो ड्रायव्हरकी करून उपजीविका भागवत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IAS Transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले

Badlapur : बदलापूरमध्ये वायूगळती; पूर्व भागात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट

Kabutar Khana : कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात जैन समाज आक्रमक; आजपासून जैन बांधवांचं उपोषण

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठका