Shahrukh Khan Team Lokshahi
मनोरंजन

...म्हणून शाहरुखला बॉलिवूडचा बादशाह म्हणतात; 'पठाण'च्या कमाईने रचला इतिहास

पठाणचा डंका देश-विदेशात वाजत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूडच्या बादशाह शाहरुख खानने पुन्हा एकद इतिहास रचला आहे. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या पठाण या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार केला. रिलीजच्या पहिल्या टप्प्यात जगभरात 1 हजार कोटींची कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. भारतात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 516.92 कोटींवर गेले आहे. पठाणचा डंका देश-विदेशात वाजत आहे.

पठाण हा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. पठाणकडून त्याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. रिलीजच्या 27 व्या दिवशीही या चित्रपटाने दमदार कमाई सुरूच ठेवली आहे. किंग खानच्या चित्रपटाने 1 हजार कोटींचा आकडा ओलांडला असेल, पण हा चित्रपट सर्वाधिक कलेक्शनच्या बाबतीत अजूनही काही टॉप चित्रपटांमध्ये मागे आहे.

एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. राम चरण, जूनियर एनटीआर यांचा हा चित्रपट ऑस्कर आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे जगभरात 1170 कोटींचे कलेक्शन आहे.

आमिर खानच्या दंगल या चित्रपटानेही देश-विदेशात विक्रम केला आहे. दंगलने जगभरात 2070.3 कोटींची कमाई केली आहे. तर, प्रभासच्या बाहुबली या चित्रपटाने जगभरात 1788.06 कोटी कमावले आहे. यशच्या केजीएफ 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे. या चित्रपटाने जगभरात 1208 कोटींची कमाई केली. आता यानंतर शाहरुख खानचा पठाण चित्रपट हे रेकॉर्ड ब्रेक करू शकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी