Shahrukh Khan
Shahrukh Khan Team Lokshahi
मनोरंजन

Shahrukh Khan : शाहरुखचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल...

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुखने चित्रपटाच्या पडद्यावर पुन्हा एन्ट्री केली असून चाहते त्यांना पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यास खूप उत्सुक आहेत. शाहरुखचे एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना हे चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये तो 'ना जा' या पंजाबी गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर किंग खान आपली हुक स्टेप करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शाहरुख फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. जो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर हा व्हिडिओ शाहरुखचा 'डंकी' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. ज्यामध्ये सेटवर मोकळ्या वेळेत उपस्थित असलेले सर्वजण शाहरुखच्या डान्सचा आनंद लुटताना पहायला मिळतं.

Shahrukh Khanशाहरुखचा हा व्हायरल व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूपच आवडलेला असून यावेळी बऱ्याच कालावधी नंतर शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. शाहरुख खान अखेरचा आनंद एल या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला जम बसवण्यात सक्षम ठरला नाही. या चित्रपटात अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या दोन अभिनेत्री देखील होत्या. प्रदीर्घ कालावधीनंतर आता शाहरुख पुन्हा जोरदार कमबॅक करणार आहे.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर किंग खानचा आगामी 'पठाण' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये शाहरुखची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. नुकत्याच काही कालावधीपूर्वी या चित्रपटातील त्याचा लूक समोर आला आहे. 'पठाण'मध्ये दीपिका पदुकोण (Dipeeka Padukon) आणि जॉन अब्राहम (John Abraham) दिसणार आहेत. दिग्दर्शक एटलीच्या 'जवान' आणि राजकुमार हिरानीच्या 'डंकी' या प्रोजेक्ट्स मध्येही शाहरुख मुख्य भूमिकेत असणार आहे.

रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

बारामतीत पैशांचा पाऊस? रोहित पवारांनी केला व्हिडिओ ट्विट

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा! राज्यातील लोकसभेच्या 11 जागांवर आज मतदान