Shahrukh Khan Lokshahi Team
मनोरंजन

Shahrukh Khan : 'जवान'ची तुलना हॉलिवूडच्या चित्रपटाशी ?

शाहरुखच्या लुकबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटले.

Published by : prashantpawar1

बॉलीवूडचा किंग खान म्हणून नामांकित असणारा अभिनेता शाहरुख खान(Shaharukh Khan)यांनी शुक्रवारी 3 जून रोजी आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं होतं. किंग खानने 2 जून 2022 रोजी त्याचा आगामी 'जवान' चित्रपटाचा टीझर त्याने शेअर केला आहे. या टिझरमधील शाहरुखच्या लुक बद्दल सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. जखमी आणि बँडेजमध्ये गुंडाळलेले अवस्थेत शाहरुखला पाहून प्रेक्षकांच्या मनातही चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढलेली आहे. सर्वांनी या टिझरचे तोंडभरून कौतुक केले आहे. सलमान खानने देखील याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परंतु काहींनी शाहरुखच्या या लूकचे वर्णन 1990 च्या हॉलिवूडचा 'डार्कमन' या चित्रपटाशी केलेले आहे.

जेव्हा शाहरुखने आपल्या 'जवान' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला तेव्हा अनेक चाहत्यांनी शाहरुखच्या पट्टी बांधलेल्या अवस्थेतला लूक पाहिला आणि त्याची तुलना डार्कमॅनशी करायला सुरुवात केली. हा 1990 मधील होलिवूडचा सुपरहिट चित्रपट होता. त्यात लिआम नीसनने टायट्युलर अँटीहिरोची भूमिका निभावली होती. ज्याला जिवंत जाळल्यानंतर मरण्यासाठी सोडण्यात आले होते. यानंतर तो आपल्या शरीरावरील खुणा लपवण्यासाठी बँडेजची मदत घेतो. आणि ज्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा बदला घेण्यासाठी तो पुन्हा परत येतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ramdas Kadam : सावली बार प्रकरणावरून राजकारण तापलं : रामदास कदमांचा परबांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले - "तू राजीनामा...."

Aaditya Thackeray X Post : फ्रेंडशिपच्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना काढला चिमटा!

Russia Earthquake News : कामचाटकात निसर्गाचा कहर: तीव्र भूकंप आणि ज्वालामुखीचा स्फोट

Ahilyanagar : 'प्री-वेडिंग' बंद करा, लग्न, साखरपुडा, हळद...; हगवणे प्रकरणानंतर अहिल्यानगरात मराठा समाजाचे आचारसंहिता संमेलन