Shehnaaz Gill Team Lokshahi
मनोरंजन

Shehnaaz Gill : शहनाज गिलने शेअर केला डेब्यू रॅम्प वॉकचा Experience

शहनाज गिलने पडद्यामागचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Published by : shweta walge

शहनाज गिलचा (Shehnaaz Gill) नुकतेच आपले डेब्यू रॅम्प वॉक (Debut Ramp Walk) केला आहे. अहमदाबादमध्ये ती डिझायनर सामंत चौहानसाठी (Samant Chauhan) रॅम्प वॉक करताना दिसली. यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल झाला होता. आता शहनाज गिलने पडद्यामागचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज गिल रॅम्पवर चालण्यापूर्वी ती किती नर्व्हस होती हे सांगताना दिसत आहे.

शहनाज गिल म्हणते, "मला असे वाटते की आज माझी परीक्षा आहे, कारण ही माझी पहिलीच वेळ आहे. रॅम्प वॉकचा मी कधीही अनुभव घेतला नाही. आणि माझी एकच इच्छा आहे की मी आज चांगली कामगिरी करू."

शहनाज गिलने तिच्या स्वतःच्या रॅम्प वॉकचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री म्हणाली की ती परीक्षा उत्तीर्ण झाली आहे आणि तिचा पदार्पण रॅम्प वॉक परिपूर्ण होता. शहनाज गिल सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे. पूर्वी, तिने रफल व्हाइट वेस्टर्न ड्रेसमध्ये तिच्या जबरदस्त लुकसह दिसली होती. शहनाजच्या या सुंदर लूकवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचे पूल बांधले होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शहनाज गिल 'कभी ईद कभी दिवाळी' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटात दिसणार आहे. या अभिनेत्रीचा हा डेब्यू चित्रपट आहे. शहनाज गिल सलमान खानसोबत (Salman Khan) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा