Sunny Deol Lokshahi Team
मनोरंजन

सनीचा सेटवरील लुक व्हायरल...

शुटिंग दरम्यानचा सनी देओल सेटवर वेगळ्या अंदाजात....

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचा(bollywood) अभिनेता सनी देओल (sunny deol) आपल्या अभिनयासाठी नामांकित अभिनेत्यांच्या हिटलिस्टमध्ये म्हणून त्याची ओळख आहे. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता ज्याक्षणी सनी देओलच्या (sunny deol)अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात होते. आणि आजही सनी देओलला प्रेक्षक तेवढेच महत्व देतात आणि चाहते देखील सनीवर तेवढच प्रेम करतात. सनी देओल काही दिवसांपूर्वी जयपूरमध्ये (Jaipur)मल्याळम क्राईम थ्रिलर ' जोसेफ ' चे हिंदी रिमेक 'सूर्या'ची शुटिंग करत होता. अगदी याच चित्रपटतला त्याचा लुक सोशल मीडियावर व्हारल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सनी देओल लांब दाढीमध्ये दिसत आहेत. त्याने चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला असून तो एका पायऱ्यांवरती बसलेला असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या मते सनी देओल त्याच्या आगामी चित्रपटात एका अशा व्यक्तीची भूमिका साकारतात ज्याच्या आयुष्यात सगळं काही आनंदाने व सुरळीतपणे चालू असतं. काही काळानंतर हळूहळू आयुष्याच्या प्रवासात या सगळ्या गोष्टींपासून तो व्यक्ती दुरावतो. आपलं पुढील आयुष्य जगत असताना तो द्वेष , क्रोध आणि नैराश्यात अडकलेला असतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन एम. पद्मकुमार(M. Padmakumar) करणार आहेत. ज्यांनी 'मुल' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे.चाहत्यांसाठी एक चांगली बातमी म्हणजे अभिनेता सनी देओल त्याचा आगामी चित्रपट ' सूर्या ' व्यतिरिक्त गदर 2 आणि अपने 2 मध्ये देखील पहायला मिळणार आहे. .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?