Maharashtrachi Hasyajatra Poste 
मनोरंजन

महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून 'ह्या' अभिनेत्रीची एक्झिट…

Published by : Vikrant Shinde

सध्या सोनी मराठीवर(Sony Marathi) महाराष्ट्राची हास्य जत्रा हा( Maharashtrachi Hasya Jatra ) विनोदी कार्यक्रम तुफान चालतोय. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. नुकतेच या कार्यक्रमाने त्यांचे 500 एपिसोड पूर्ण केलेत. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुद्धा ह्या कार्यक्रमातील सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला होता. अश्या लोकप्रिय कार्यक्रमातून एक अभिनेत्री एक्झिट घेत आहे.

Vishakha subhedar in Maharashtrachi Hasyajatra

तिचं नाव आहे विशाखा सुभेदार( Vishakha Subhedar ). विशाखा आणि समीर (Vishakha & Sameer) हे या कार्यक्रमाचे दोन महत्त्वाचे कलावंत आहेत. या दोघांच्या स्कीट्स ना रसिक प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत असतो. पण विशाखा सुभेदार हिने हा शो का सोडला? यासंदर्भात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून या संबंधाची माहिती दिली आहे.

त्या पोस्टमध्ये विशाखा सुभेदार असे म्हणतात की, “एक निर्णय -🙏🏻
नमस्कार मंडळी..
अनेक वर्ष.. स्किट फॉरमॅट मध्ये काम करतेय.. कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, बुलेट ट्रेन, आणि हास्यजत्रा..!
2011 पाहिलं पर्व विजेता जोडी,मांगले मी..आणि आज 2022
समीर विशाखा..
मंडळी हा प्रवास खरंच सोपा नाहीय…! मी काही फार great विनोदी अभिनेत्री नव्हतेच कधी, पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय करता येईल ह्याचा शोध घेणे किंवा जे लेखकाने लिहिले आहे ते उत्तमरित्या बाइंडिंग करून सादर करणे हे मात्र प्रामाणिक पणे केलं...
माझ्या सहकलाकारांच्या साथीने, आम्हा दोघांचीही काम कशी फुलतील ह्याचा विचार करीत,त्यांच्याबरोबर परफॉर्मन्ससाठी लागणारे tuning, बॉण्डिंग, केमेस्ट्री सगळं क्रिएट केलं."

या कार्यक्रमातून एक्झीट घेतल्यानंतर त्या काय करणार याचे उत्तर त्यांनीच आपल्या पोस्ट मधून दिले आहे यासंदर्भात त्या लिहितात, “एक छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती फिल्म मधली 20/25 दिवसांच्या प्रवासाची किंवा नाटक 500 ते 1000 प्रयोगाची, किंवा मग सिरीयल मधली असो,मला ह्या वाटेवरचा प्रवास सुरु करायचा आहे..!
इथलाही प्रवास खडतरंच असतो, सोपा नाहीच तो.
पण ना,इथे एकाच भूमिकेत राहून काही काळ प्रवास करता येतो".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rohit Pawar : "परप्रांतीय शिक्षकांच्या भरतीतून..." रोहित पवारांचा भाजपला टोला

Pandharpur Accident : पंढरपूरवरून परतताना एसटीचा अपघात, अपघातात जवळपास 30 जण जखमी

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

Nitin Gadkari : "...तर तिसरं महायुद्ध कधीही पेटू शकतं", नितीन गडकरींनी दिली तिसऱ्या महायुद्धाची शक्यता ?