मनोरंजन

हे असेल आलीया, रणबीरच्या मुलीचे नाव........

आलिया रणबीरला गोंडस कन्यारत्न प्राप्त झाले.

Published by : Team Lokshahi

कालचा दिवस रणबीर, आलिया च्या आयुष्यातील सर्वात मोठ दिवस होता . आलिया ने काल एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. काल सोशल मिडीयावर पोस्ट टाकून आलियाने चाहत्यांसमोर आपल्याला कन्यारत्न झाल्याचे जाहीर केले. यावर चाहत्यांनी आलिया आणि रणबीरवर भरगोस शुभेछ्यांचा पाऊस पाडला. आपल्या अभिनायाने दोघेही जसे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात, तसेच आता त्यांच्या मुलीचे नाव काय यावरही चाहत्यांची चर्चा सुरु आहे.

आता चाहत्यांच्या मनात वेगळाच प्रश्न उत्भवला आहे, आलिया, रणबीर आपल्या मुलीचे नाव काय ठेवतील? याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. २०२२ हे वर्ष आलिया आणि रणबीर साठी फारच कमालीचे आणि गोल्डन वर्ष ठरले आहे. 'गंगुबाई काठीयावाडी' 'ब्रम्हास्त्र' ने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली. त्याच्या भरगोस यशानंतर हा सुखद क्षण त्यांच्या दोघांच्याही आयुष्यात आला.

याच चित्रपटांसाठी आलियाने भरपूर प्रमोशन इवेंट केले याचदरम्यान 'गंगुबाई काठीयावाडी' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलियाला एक प्रश्न विचारण्यात आला होता कि, “आलियाच्या ऐवजी तुझे दुसरे एखादे नाव असते, तर ते काय असलेले तुला आवडले असते?” यावर आलिया अशी म्हणली कि, ''मला आवडणारे नाव 'आयरा' आहे या नावाच्या स्पेलिंगमध्ये आलियाचा 'आय' आणि रणबिरचा 'रा' , अश्या दोघांच्याही नावाचा उल्लेख होता, म्हणूनच दोघे आपल्या मुलीचे नाव 'आयरा' ठेवतील अशी आशा चाह्त्यांना आहे. त्याचप्रमाणे 'आयरा' नावाचा अर्थही फारच सुरेख आहे, 'आयरा' म्हणजे जिच्याकडून प्रेरणा घेतली जाते, जिचा सन्मान केला जातो अशी. त्यामुळे दोघे आपल्या मुलीचे नाव 'आयर ठेवतील कि आणखीन काही यावर प्रेक्षाकंचे लक्ष लागलेले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या