टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या विचित्र ड्रेसमुळे दररोज चर्चेत असते. तीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उर्फी जावेदने पुन्हा एकदा असा ड्रेस परिधान केला आहे जो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. एकीकडे तीचे चाहते तीचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे सर्व सोशल मीडिया यूजर्सने तीला जोरदार ट्रोल करत आहेत.
उर्फी जावेदने इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नेहमीप्रमाणे नवीन ड्रेसमध्ये दिसत आहे. उर्फी जावेदचा हा नवीन ड्रेस इतका अनोखा आहे की लोकांनी त्यावर जोरदार कमेंट केल्या आहेत. उर्फी जावेदच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तिने तिचा वरचा भाग ड्रेसने नाही तर हाताने झाकलेला आहे. हे हात उर्फी जावेदचे नसून दुस-या कोणाचे असून याचे श्रेय त्यांनी श्वेता गुरमीत कौरला दिले आहे. यावर त्यांनी 'मदतीचा हात' अशी टिप्पणी लिहिली आहे. श्वेता गुरमीत कौरनेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही गोष्ट शेअर केली आहे. तीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून यासोबतच लोकांनी तीला ट्रोलही केले आहे.
उर्फी जावेद झाली ट्रोल
उर्फी जावेदच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'स्वस्त लोक.' एका यूजरने लिहिले आहे की, 'पृथ्वीचा विनाश निश्चित आहे.' एका यूजरने लिहिले आहे की, 'वेडेपणाचीही एक सीमा असते, कोणीतरी याला भारतातून हाकलून देऊ द्या.' एका यूजरने लिहिले आहे की, 'याने भारताच्या संस्कृतीला फाटा दिला आहे, सरकारने यावर कारवाई करावी.' अशाप्रकारे सोशल मीडिया युजर्सनी उर्फी जावेदचा खरपूस समाचार घेतला आहे.