मनोरंजन

'बवाल'ची रिलीज डेट 'या' कारणामुळे ढकलली पुढे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटद्वारा निर्मित, नितेश तिवारीद्वारा दिग्दर्शित आणि वरुण धवन आणि जान्हवी कपूर अभिनीत आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट 'बवाल'ची घोषणा झाली आहे. यानंतर याची चर्चा सर्वत्र आहे.

अशातच, चित्रपटाच्या निर्मात्यांनी खुलासा केला आहे की व्हीएफएक्स (VFX) आणि टेक्निकल आवश्यकतांमुळे सिनेमाच्या रिलीजमध्ये उशिर होऊ शकतो. तसेच, पोलंडमध्ये विशेष टेक्नोलॉजी वापरून या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले असून, निर्माते एक महत्त्वाकांक्षी ऑनस्क्रीन सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

याबद्दल बोलताना दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले, या सीक्‍वेन्सवर आम्हाला जसे व्हिज्युअल परफेक्शन मिळवायचे आहेत. त्यासाठी आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणार आहे. आमचे बेस्ट व्हर्जन दर्शकांसमोर सादर करणे हे आमचे ध्येय असल्याने आम्ही कोणत्याही गोष्टीशी तडजोड करू इच्छित नाही.

'दंगल' आणि 'छिछोरे' नंतर, नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'बवाल' चित्रपटाचे शूटिंग उत्तर प्रदेशातील लखनऊसह ॲम्स्टरडॅम, नेदरलँड आणि पोलंड या ठिकाणी झाले असून, नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांना मुख्य भूमिका साकारताना पाहायला मिळेल. अशातच, नाडियाडवाला ग्रॅंडसनच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला यांनी 'बवाल'ची निर्मिती केली असून, अर्थस्काय पिक्चर्सने याची सह-निर्मिती केली आहे.

Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला

Loksabha Election 2024 : देशभरातील 12 राज्यांतील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळावं, धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय