RaveenaTandon
RaveenaTandon Team Lokshahi
मनोरंजन

रवीना टंडनने टायगरच्या जवळ जाऊन बनवला व्हिडिओ; चौकशीचे आदेश

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने नुकताच वाघाच्या अगदी जवळ जाऊन एक व्हिडिओ बनवला, जो तिने इंटरनेटवर शेअर केला. या व्हिडिओवर वन राखीव अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. वृत्तानुसार, सातपुडा व्याघ्र प्रकल्पाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय सफारी जिप्सी चालक, कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये जंगलातील विविध प्राणांचे फोटो घेतल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे रवीनाने या सफरीमध्ये वाघांचे सुद्धा फोटो काढले आहेत

सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या नियमानुसार सफारीदरम्यान जिप्सीचे प्राण्यांपासूनचे अंतर किमान २९ मीटर असायला हवे. मात्र रवीना टंडन यांनी हे नियम पाळले नाहीत. तपासात रवीना दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई होऊ शकते. सातपुडा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने रवीना टंडनच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, टायगरच्या व्हिडिओ शूटींगदरम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यावेळी तिची मुलगीही तिच्यासोबत होती. यामुळे रवीनावरच नाही तर ड्रायव्हर आणि गाईडवरही कारवाई होऊ शकते.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका