Thalapathi Vijay Team Lokshahi
मनोरंजन

Thalapati Vijay : खलनायकाच्या भूमिकेत दिसणार थालापती विजय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपटात तो मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Published by : prashantpawar1

सध्या बॉलिवूडचा किंग खान (Shahrukh Khan) आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांच्या डंकी तसेच सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांचा 'पठाण' आणि अ‍ॅटलीचा 'जवान' या चित्रपटांचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथ स्टार थलापती विजय (Thalapathi Vijay) हा सुपरस्टार देखील दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपटात तो मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार थालापथी शाहरुखच्या कामासाठी एक रुपयाही आकारणार नसल्याचं म्हटलं जातय. या चित्रपटात विजयची भूमिका खलनायकाची आहे जी कॅमिओसाठी पण महत्त्वाची आहे.

'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शक ऍटली यांच्याशी विजयची अगदी जवळची मैत्री आहे. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये मेर्सल आणि थेरी यांनी दाक्षिणात्य चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर उत्तम व्यवसाय केला आहे. त्यामुळेच तो जवान या चित्रपटात काम करण्यासाठी एकही रुपया घेणार नसल्याचं सांगितलं जातय. जवान हा शाहरुखचा पहिला चित्रपट आहे. जो ऍटली आणि शाहरुख या दोघांनाही एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

जवान हा शाहरुखचा संपूर्ण मनोरंजन करणारा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात नयनतारा देखील मुख्य भूमिकेत आहे. जवान हा चित्रपट 2 जून 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या 5 भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप