टोक्यो ऑल्मिपिकध्ये भारताला पहिलं पदकं मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचं सर्वत्र कौतुक झालं. मीराबाई चानू ही सलमान खानची मोठी फॅन असून तिने अनेकदा हे मुलाखतीत सांगितंल होतं. त्यानंतर सलमान खानने मीराबाईची भेट घेतली.सलमान खान आणि मीराबाईच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सलमान खान पुन्हा ट्रोल होवू लागलाय.
या फोटोमध्ये सलमान खानच्या गळ्यामध्ये एक मणिपुरी स्कार्फ दिसून येत आहे. सलमान खानच्या गळ्यातील या स्कार्फवरील एका चित्राने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या स्कार्फवर काळ्या हरणांचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे सलमान खानच्या या स्कार्फवर हरणांचं चित्र दिसतात नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा फोटो सलमान खानने मीराबाई चानूच्या भेटीचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
कळवीट शिकार प्रकरणी अनेक वर्षापासून सलमान खान ट्रोल होत होता.त्यामुळे स्कार्फवर हरीण पाहताच नेटकऱ्यांनी कमेंट करत निशाणा साधण्यास सुरुवात केली.