Vivek Oberoy Lokshahi Team
मनोरंजन

ब्रेकअपनंतर ऐश्वर्याबद्दल असं काही बोलला विवेक की

एका मुलाखतीदरम्यान काही गोष्टी आल्या समोर

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय( vivek Oberoi) आपल्या वैयक्तिक जीवनातील काही किस्से चाहत्यांना शेअर नेहमी करत असतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी विवेकने त्याच्या सोबत घडलेल्या काही गोष्टी चाहत्यांना शेअर केल्या आहेत. खरं तर ऐश्वर्या रॉय (aishwarya rai)सोबत रिलेशनशिप मध्ये असताना विवेकचा अनेकदा सलमान खान(salman khan)सोबत देखील वाद झाला होता. त्यावेळी विवेक आणि ऐश्वर्या यांची प्रेमकहाणी बरीच चर्चेचा विषय ठरायची. काही कालावधीनंतर दोघांमध्ये ब्रेकअप झालं.

त्यानंतर ऐश्वर्या सोबत झालेल्या ब्रेकअप बद्दल बोलताना ते म्हणाले. ऐश्वर्या सोबत ब्रेकअप दरम्यान मला बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागलं. कारण त्यावेळी मी अगदी मानसिक तणावाचा शिकार बनलेलो होतो. या सर्व गोष्टीतून बाहेर पडत मला एक समाधानी आयुष्य जगायचे होते. या सर्व गोष्टींमुळे माझ्या वयक्तिक आयुष्यावर त्याचे वाईट परिणाम झाले होते. खरं तर मी अगदी डिप्रेशनचा बळी झालो होतो असं देखील ते म्हणाले.

आयुष्यात चढ उतार चालू असतानाच एक दिवस त्यांच्या आयुष्यात प्रियंका अल्वा ( Priyanka Alva)हिने प्रवेश केला आणि विवेकच्या जीवनात एक नवी सुरुवात झाली होती.

कामाबद्दल बोलताना विवेक ओबोरॉय म्हणतात की मी माझ्या कामाप्रति खूप जागरूक असतो. मी नात्यांनाही प्रत्येकवेळी तेवढीच किंमत देतो जेवढी मी वयक्तिक आयुष्यात स्वतःला देतो. प्रियांका सोबत माझं आयुष्य अगदी आनंदाने व सुरळीतपणे चालू असं त्याने आपल्या चाहत्यांना सांगितलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा