गणेशोत्सव 2024

Ganpati Visarjan: पुण्यातील पाचव्या मानाच्या केसरी वाडा गणपतीला विसर्जन करत निरोप...

आता अखेर पुण्यातील पाचव्या मानाचा गणपतीचे म्हणजेच केसरी वाडा गणपतीचे देखील विसर्जन झालेले आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबईसोबतच पुण्यातही बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात निरोप देण्यात येत आहे. पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती दुपारी 4 च्या आसपास विसर्जन झाला. मोठ्या प्रमाणात भाविक त्याठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर पुण्यातील तिसरा मानाचा गुरूजी तालीम गणपतीचे देखील विसर्जन मागोमाग करण्यात आले.

यानंतर पुण्याचा चौथा मानाचा तुळशी बाग गणपतीचे विसर्जन देखील सायंकाळच्या वेळेस करण्यात आले आणि आता अखेर पुण्यातील पाचव्या मानाचा गणपतीचे म्हणजेच केसरी वाडा गणपतीचे देखील विसर्जन झालेले आहे. पुण्याचा पाचवा मानाचा केसरी वाडा गणपतीच. 7 वाजून 37 मिनिटांनी विसर्जन करण्यात आल आहे. पर्यावरण पूरक पद्धतीने कृत्रिम हौदात या वर्षी देखील केसरी वाडा गणपतीच विसर्जन करण्यात आल आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात टिळक कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या केसरी वाडा गणपतीला निरोप दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...