आरोग्य मंत्रा

उकडलेले अंडे किती वेळापर्यंत खावे? जाणून घ्या नाहीतर होईल 'हा' गंभीर आजार

अंडी हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज अंडी खाणे फायदेशीर ठरते. जर तुम्हाला उकडलेले अंडे खायला आवडत असेल तर जाणून घ्या किती वेळापर्यंत खाऊ शकता?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Boiled Egg : अंडी आरोग्यासाठी नेहमीच चांगले मानले जाते. काही लोकांना उकडलेली अंडी तर काहींना ऑम्लेट खायला आवडते. आज आम्ही तुम्हाला उकडलेल्या अंड्यांबद्दल सांगणार आहोत. अंडी हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज अंडी खाणे फायदेशीर ठरते. जे फिटनेस फ्रिक आहेत त्यांच्यासाठी नाश्त्यात अंडी खाणे आवश्यक मानले जाते. जर तुम्हाला उकडलेले अंडे खायला आवडत असेल तर जाणून घ्या किती वेळापर्यंत खाऊ शकता?

उकडलेले अंडे खाण्याचे अनेक फायदे

अंड्यांमध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. त्याचबरोबर ते शरीराला ऊर्जावान ठेवते. अंड्यांमध्ये प्रथिने, लोह, व्हिटॅमिन A, B6, B12, फोलेट, एमिनो अ‍ॅसिड, फॉस्फरस आणि सेलेनियम आणि आवश्यक फॅटी अ‍ॅसिड (लिनोलिक, ओलेइक अ‍ॅसिड) मुबलक प्रमाणात असतात. नाश्त्यापासून स्नॅक्सपर्यंत अंडी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

उकडलेले अंडे किती वेळापर्यंत खाऊ शकता?

अंडी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवली जातात. आता प्रश्न असा येतो की उकडलेले अंडे किती वेळाने खावे? तुम्ही उकडलेले अंडे 5-7 दिवस साठवून ठेवू शकता आणि ते आरामात खाऊ शकता. याचा आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम दिसणार नाहीत.

उकडलेले अंडी कसे साठवायचे?

जर तुम्ही अंडी कमी उकडली तर ते 2 दिवसात खावे. जर अंड्याचे शेल्फ उकडताना तुटले असेल तर ते 2-3 दिवसात खाल्लेच पाहिजे. अशी अंडी जास्त काळ साठवून ठेवू नयेत कारण त्यांचा PH बदलतो. आणि मग वास येऊ लागतो. अंडी उकडल्यानंतर थंड पाण्यात ठेवा. ते थंड झाल्यावर स्वच्छ कापडाने पुसूनच नंतर त्याचे पाणी चांगले सुकल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे अंड्यामध्ये कोणतेही बॅक्टेरिया राहत नाहीत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती