मेष (Aries Horoscope)
कोणावरही अंधविश्वास न ठेवता खात्री करून घेतलेले निर्णय फायद्याचे राहतील. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करावी. विरोधकांमार्फत त्रासिक घटना घडवून येतील. वाद-विवाद टाळावा. गृहसौख्य चांगले लाभेल. आप्तेष्टांच्या भेटी घडून येतील.
वृषभ (Taurus Horoscope)
जीभेवर ताबा ठेवावा. प्रसंगी बोलण्यातून वाद-विवाद घटना घडून येतील. कामाचा उरक चांगल्या प्रकारे राहील. प्रवास घडून येतील. कौटुंबिक खर्च निर्माण होतील. परंतु, शांती व संयम या गोष्टीची सांगड घातल्यास फायदेशीर ठरेल.
मिथुन (Gemini Horoscope)
आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. अस्थि संबंधी, पाया संबंधी, गुडघ्या संबंधी तक्रारी निर्माण होतील. वाहनापासून धोका निर्माण होईल. महत्त्वाचे प्रॉपर्टी बद्दल वैचारिक स्थिती संकोच निर्माण करेल. परंतु, निर्णयाला स्थगिती खूप महत्त्वाची असेल.
कर्क (Cancer Horoscope)
निर्णय समोर घेताना भीतीदायक प्रसंग निर्माण होतील. कागदोपत्री व्यवहार करताना वाचल्याशिवाय कुठेही स्वाक्षरी करू नये. लोक संधीचा फायदा करून घेतील व तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतात या गोष्टी काळजीपूर्वक तपासा.
सिंह (Leo Horoscope)
अत्यंत समाधानी व प्रसन्नता निर्माण करणारा दिवस असेल. गुरुकृपा गुरुनिष्ठा गुरुतुल्य व्यक्तीमार्फत फायदा होईल. आरोग्याच्या समस्या दुर होतील. कुटुंबासोबत शुभ कार्यात सहभागी व्हाल.
कन्या (Virgo Horoscope)
धार्मिक प्रवास घडेल. चांगल्या संधी निर्माण होतील. त्याचा फायदा करून घ्यावा. सर्वांना सोबत घेऊन निर्णय किंवा काम केले तर कामे यशस्वी होतील. तामसीपणा, चिडचिडेपणाला आवर घालावा. या गोष्टीमुळे मानसिकतेवर व शरिरावर अचानक परिणाम दिसून येतील. संयम ठेवणे फायद्याचे राहील.
तूळ (Libra Horoscope)
मनस्वी आनंद देणारा दिवस ठरेल. नोकरदारांना आर्थिक दृष्टीने समाधानकारक असेल. अधिकार प्राप्ती मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांमार्फत समाधानकारक घटना घडून येतील. कामानिमित्त प्रवास होईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
उत्साहवर्धक दिवस असेल. आनंदी व समाधानी राहून मानसिक स्थिती चांगली असेल. काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. प्रवास घडतील. संपर्कातून अनेक मित्र-मैत्रिणी ओळखी होतील. जोडीदाराची साथ मिळेल.
धनु (Sagittarius Horoscope)
आर्थिक लाभ होतील. आवश्यक तिथे खर्च करावा वाहनापासून धोका निर्माण होऊ शकेल. गडबडीमुळे जलदगती परिणामी घातक ठरू शकेल. निर्णय घेताना वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल.
मकर (Capricorn Horoscope)
अधिकार प्राप्ती होतील. अधिकारी लोकांच्या उच्चशिक्षित लोकांच्या गाठी घडून येतील. नवनवीन लोकांसोबत ओळख निर्माण होईल. मदतीचा हात विचार करून गांभीर्याने केलेली मदत फायद्याची ठरेल तडकाफडकी घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात.
कुंभ (Aquarius Horoscope)
नवनवीन घटना घडून येतील. अचानक जबाबदाऱ्या अंगावर पडतील. हितचिंतकांमार्फत घेतलेले निर्णय फायद्याचे राहतील. नवीन गोष्टीचा उपभोग घेता येईल प्रवास घडून येतील. स्वास्थसंबंधी थोडीशी काळजी त्रास देईल. कलागुणांना चांगल्याप्रकारे वाव मिळेल.
मीन (Pisces Horoscope)
नवीन व्यवसायासाठी चांगली संधी निर्माण मिळेल. कौटुंबिक लोकांमार्फत पाठबळ मिळेल. आनंदी वार्ता कानावर पडतील. प्रकृती संबंधित थोडे त्रास उद्भवतील. कामाचा आराखडा ठरवून केलेली कामे यशस्वी राहतील. विद्यार्थी मित्रांना कष्टाचे फलित आनंददायी ठरेल.