Jitendra Awhad Wins in Mumbra Kalva 
Vidhansabha Election

Jitendra Awhad: मुंब्रा-कळव्यातून जितेंद्र आव्हाड विजयी

मुंबईतील मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नजीब मुल्ला यांचा पराभव केला आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. महायुती आघाडीवर असल्यामुळे राज्यात महायुती सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साल २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळाले. राज्यातील महत्त्वाचे असलेले दोन पक्षांना फुटीचा सामना करावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जनतेचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र, सध्याचे चित्र पाहता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत.

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड 157141 मतांनी विजयी झाले आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नजीब मुल्ला यांचं आव्हान होतं. नजीब मुल्ला यांना 60913 मतं मिळाली आहेत. मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघातून आव्हाडांना तिसऱ्यांदा विजय मिळाला आहे. २००९ पासून या मतदारसंघात जितेंद्र आव्हाड आमदार आहेत.

मी मुंब्रा-कळव्यातील सर्व मतदारांचा आभारी आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मजबूत लोकशाहीसाठी मतदान केले! मुंब्रा-कळव्याच्या चांगल्या भविष्यासाठी आमच्या व्हिजनवरील तुमचा विश्वास मला दररोज प्रेरित करतो. मी सर्व सहकारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अपार मेहनतीबद्दल आणि माझ्या आघाडीच्या भागीदारांसाठी खूप आभारी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.", मतदानानंतर आव्हाड यांनी X वर पोस्ट केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Crime Update : पुण्यात गणेश विसर्जनाच्या आधी गोळीबार, गँगवॉरचा भयंकर उद्रेक!

Latest Marathi News Update live : गणपती विसर्जन आणि ईदनिमित्त यवतमाळमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त...

Anant Chaturdashi 2025 : बाप्पाला निरोप देताना "अनंताचा धागा" का बांधतात जाणून घ्या यामागचं महत्त्व

Anant Chaturdashi 2025 Wishes : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...! अनंत चर्तुदशीनिमित्त गणेशभक्तांना पाठवा खास शुभेच्छा, WhatsApp, Facebook च्या माध्यमातून ठेवा कोट्स स्टेटस