India

सुरक्षा दलांना मोठे यश: जम्मू-काश्मिरात चार दहशतवाद्यांचा खात्मा

Published by : Jitendra Zavar

जम्मू-काश्मिरमधील (Jammu-Kashmir)दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी (indian security forces) मोठी कारवाई सुरु केली. त्यात सुरक्षा दलाला चांगले यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा (terrorists)खात्मा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी सुमारे 4-5 भागात संयुक्त कारवाई सुरू केली होती. यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दुसरीकडे, गांदरबल जिल्ह्यातील काउबाग नान्नर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये 2 दहशतवादी अडकल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात मोठी कारवाई केली. पुलवाला येथे लष्करी कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी मारले गेले. तर गांदरबल आणि हंदवाडा येथे लष्कराचा एक दहशतवादी मारला गेला. काश्मीरच्या आयजींनी सांगितले की, आम्ही काल रात्री 4-5 ठिकाणी संयुक्त कारवाई सुरू केली होती. रात्रीपासून चकमक सुरू आहे. गंदरबल जिल्ह्यातील काउबाग नान्नर भागात दोन दहशतवादी अडकले आहेत. त्याचबरोबर अन्य काही ठिकाणीही लष्करी कारवाई सुरू आहे. काश्मीरमध्ये 3 चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले आहेत. पुलवामा येथे दोन, गांदरबल आणि हंदवाडा येथे प्रत्येकी एक दहशतवादी मारला गेला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...