Benefits Of Cloves Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Benefits Of Cloves : लवंगाचं सेवन केल्याने होतात 'हे' फायदे

मसाल्यांमधील लवंग ही औषधी आणि महत्त्वपुर्ण घटकांनी भरलेली असून ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Published by : shamal ghanekar

मसाल्यांमधील लवंग (Cloves) ही औषधी आणि महत्त्वपूर्ण घटकांनी भरलेली असून ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लवंग मसाल्याप्रमाणे ते गोड पदार्थामध्येही वापरली जाते. तिचा आकार छोटा असला तरी तिच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. दातदुखीसाठीही लवंगचा वापर केला जातो. एवढेच नाही तर लवंग अनेक आजारांवरही रामबाण उपाय आहे. तर चला जाणून घेऊया त्याचे फायदे आणि गुणधर्म.

कधी कधी आपल्या होणाऱ्या दातांच्या वेदना दुर करण्यासाठी लवंगचा वापर केला जातो. त्यामुळे होणाऱ्या वेदनापासून थोडा आराम मिळतो. कापसामध्ये लवंगाचे तेल घालून दुखत असलेल्या भागावर म्हणजे दाताला लावल्याने तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.

तसेच शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही लवंगचा वापर केला जातो. इन्फेक्शन (infection) आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारासाठी लवंगाचे सेवन केल्याने शरीराला आराम मिळतो. त्यामध्ये असलेल्या अँटी ऑक्सीडेंटमुळे (Anti Oxident) रोगप्रतिकारशक्ती वाढते.

तुम्हाला पिंपल्सच्या समस्या दूर करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरू शकते. कारण लवंगच्या तेलामध्ये अँटी मायक्रोबियलचे (Anti Microbial) गुणधर्म असतात. जे तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी मदत करते. तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लवंगाचा लेपही लावू शकता.

लवंगाचा फायदा तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही होतो. रोज सकाळ-संध्याकाळ दोन-तीन लवंग चघळल्यास खोकला आणि तोंडाची दुर्गंधीही दूर मदत होते.

सायनस असणाऱ्या व्यक्तींसाठी लवंग हे महत्त्वाचे काम करते. दररोज 3 ते 4 चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून प्यायल्याने सायनस असणाऱ्या व्यक्तींना आराम मिळेल. तसेच, इंफेक्‍शन आणि श्वास घेताना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल.

गर्भावस्थेत अनेक महिलांना सकाळी उठल्यावर उलटी, मळमळ जाणवते. त्यामुळे यावर लवंग चघळणे फायदेशीर ठरते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?