Tea Benefits
Tea Benefits Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Tea Benefits : मसाला चहा पिण्याचे आहेत 'हे' फायदे

Published by : shamal ghanekar

चहाचे अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी, यलो टी, ब्लॅक टी (Tea) यांना प्राधान्य मिळत आहे. तसेच आपल्या पारंपारिक चहामध्ये काही मसाले घालून तो चहा प्यायल्याने ते आपल्यासाठी खूप फायदेशीर आणि आरोग्यासाठी गुणकारी असते. मसाला चहा बनवण्यासाठी आपल्याला ज्या मसाल्यांची गरज असते ते मसाले आपल्या घरी उपलब्ध असतात. मसाले चहा बनवण्यासाठी लवंग, वेलची, आलं, दालचिनी, तुळस हे सर्व आपल्या घरी सहजरित्या उपलब्ध असतात.

मसाले चहाचे फायदे

मसाला चहामध्ये अद्रकचा (Ginger) वापर केल्याने चहाही चांगला लागतो. पावसाळ्यामध्ये होणारी सर्दी, डोकेदुखी आणि खोकला यावर रामबाण उपाय म्हणजे मसाले चहा. कारण मसाले चहामध्ये अद्रक असल्यामुळे आपल्याला आराम मिळतो.

मसाला चहामध्ये वेलचीचा (Cardamom) वापर केल्याने चहा चांगला होतो. कारण वेलची ही पचनशक्ती सुधारते. आणि अॅसिडिटीचा त्रासही कमी होतो. त्यामुळे मसाले चहामध्ये वेलची वापर केल्याने त्याचा फायदा शरीराला होतो.

मसाले चहामध्ये दालचिनीचा (Cinnamon) वापर केल्याने खोकला आणि कफचा त्रास कमी होण्यास मदत होते.

तुळस (Holy Basil) ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. जर तुम्हाला मानसिक तणाव जाणवत असेल तर तुम्ही चहामध्ये तुळशीची पानं टाकून चहा पिल्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

महिलांना मासिक पाळीमध्ये पोटदुखी, कंबर दुखीचा त्रास जाणवत असतो. यावेळी मसाला चहा पिल्याने थोडा आराम मिळतो.

हिवाळ्यामध्ये मसाले चहामध्ये काळीमिरी आणि लवंग टाकून पिला जातो. कारण लवंग आणि काळीमिरी या मसाल्याच्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडंट असते, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...