लाईफ स्टाइल

कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात का?... 'या' टिप्स उपयुक्त ठरतील

स्वयंपाक करताना कांदा चिरणे हे खूप अवघड काम आहे.

Published by : Siddhi Naringrekar

स्वयंपाक करताना कांदा चिरणे हे खूप अवघड काम आहे. कांदा कापताना डोळ्यात इतका भ्रम असतो की भल्याभल्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. कांदा कापताना तुम्हालाही खूप अश्रू येत असतील तर आम्ही तुम्हाला उपाय सांगत आहोत.

कांदा सोलल्यानंतर त्याचे मधून दोन तुकडे करा. त्यानंतर पाण्यात टाकून थोडावेळ ठेवा. कमीतकमी 15 ते 20 मिनिटे पाण्यात सोडा. या पाण्यात तुम्ही व्हाईट व्हिनेगरही टाकू शकता. असे केल्याने कांद्याचे एन्झाइम्स बाहेर पडतात आणि डोळ्यातून अश्रू येणार नाहीत.

कांदा कापताना अश्रू येऊ नयेत म्हणून तो कापण्यापूर्वी 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने कांद्यामध्ये असलेल्या एन्झाइमचा प्रभाव संपतो आणि तो कापल्यानंतर डोळ्यातून पाणी येत नाही.

नेहमी धारदार चाकूने कांदे कापून घ्या. धारदार चाकूने कांदा कापला की कांद्याचा थर कापला जातो. यातून कमी एन्झाइम बाहेर पडतात. जेव्हा कांद्याच्या पेशींच्या भिंती खराब होतात तेव्हा त्यातून कमी गॅस बाहेर पडतो आणि डोळ्यांचा त्रासही कमी होतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Woman Arrest USA : अमेरिकेत भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक; पोलिसांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर संताप

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला