Health Tips
Health Tips Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Health Tips : काळ्या चण्याचे सेवन केल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

Published by : shamal ghanekar

हरभरे म्हणजेचं चणे (Chickpeas) हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. भारतीय प्रत्येक स्वयंपाकघरात कडधान्यात काळे चणे सहज आढळतात. काळे चणे खाण्याचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. काळ्या चण्यांचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार तुमच्यापासून दूर राहू शकतात. कारण चण्यांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे असतात, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. चणे खाण्याचे अनेक फायदे आहेत तर चला जाणून घेऊया काय आहेत काळे चणे खाण्याचे फायदे.

काळे चणे खाण्याचे फायदे :

काळ्या चण्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे गुर्णधर्म असते, ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. आणि काळे चणे हे आरोग्यासाठी खूप चांगले असते.

काळ्या चण्यामध्ये आढळणारे झिंक सुरकुत्या आणि मुरुम दूर करण्यासाठी मदत होते. त्यामुळे आहारामध्ये काळ्या चण्यांचा समावेश करा कारण त्याचा आपल्याला फायदाचं होईल.

काळ्या चण्याच्या सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. काळ्या चण्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे पचनासाठी आवश्यक असते.Health Tips : सोयाबीनचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे

काळ्या चण्यात लोह मुबलक प्रमाणात आढळते. ज्याच्या मदतीने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढता येते. त्यामुळे काळे चणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

काळ्या चण्यात अँटिऑक्सिडंट, सायनिडिन, पेटुनिडिनचे गुणधर्म असल्याने रक्तवाहिन्या मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकारापासून मुक्ती मिळते.

केसासाठी काळे चणे खूप फायदेशीर आहेत. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन -ए, ई हे मुबलक प्रमाणात असते. जे केस कुमकुवत होणे, केस गळणे यासारख्या समस्या (Hair Problem) होण्यासाठी मदत करते.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला