Nail extension
Nail extension team Lokshahi
लाईफ स्टाइल

Nail extensionsसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही,या सोप्या पद्धतींनी घरीच मिळवा सुंदर नखे

Published by : shweta walge

सुंदर नखे सहसा हातांचे सौंदर्य वाढवतात. तर नखांना सर्वोत्कृष्ट लूक देण्यासाठी, स्त्रिया सहसा नेल एक्स्टेंशन (Nail extensions) करण्याचा प्रयत्न करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी नेल एक्स्टेंशन सहज करू शकता.

आजकाल मुलींमध्ये नेल एक्स्टेंशन आणि नेल आर्टची (Nail art) क्रेझ खूप वाढली आहे. मुली अनेकदा नेल एक्स्टेंशनसाठी पार्लरमध्ये जातात, पण नेल एक्स्टेंशनसाठी पार्लरमध्ये जाणे आवश्यक नसते. तर तुम्ही घरच्याघरी देखील नेल एक्स्टेंशन करु शकता.

तर आम्ही तुम्‍हाला घरी नेल एक्‍सटेंशन करण्‍याच्‍या काही स्टेप्स सांगणार आहोत, ज्याने तुम्ही स्‍वत: परफेक्ट नेल एक्‍सटेंशन करू शकता.

नखे स्वच्छ करा

नेल एक्स्टेंशन (Nail extension) करण्यापूर्वी, नखे पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्यांना आकार द्या. तसेच, नखांचे क्युटिकल्स (Cuticles) आणि पुशअप्स साफ करण्यास विसरू नका. यानंतर, नेल रिमूव्हरच्या (Nail remover) मदतीने, नखांवरचे नेल पेंट (Nail paint) काढा.

नखांवर प्राइमर लावा

प्राइमर (Primer) वापरल्याने नखांना रासायनिक अभिक्रियांपासून (Chemical reactions) सुरक्षित ठेवू शकता. त्यामुळे नखांना आकार दिल्यानंतर त्यावर प्राइमर लावा.

नेल एक्सटेंशन

नखे स्वच्छ केल्यानंतर नेल फाइलरने (Nail filer) नखे घासून घ्या. यामुळे नखे खडबडीत होतील आणि नेल एक्सटेंशन चांगला चिकटेल. नखांवर नेल एक्स्टेंशन चांगले चिकटेल्यानंतर, त्यांना तुमच्या आवडीच्या आकारात कापून घ्या आणि नेल एक्स्टेंशनवर जेल नेल पेंट (Gel nail paint) लावा.

यूवी लॅम्प वापरा (UV lamp)

नेल एक्स्टेंशन पेस्ट चिकटेल्यानंतर, नखे 40 मिनिटांसाठी यूवी लॅम्पमध्ये (UV lamp) ठेवा. ही प्रक्रिया तीन ते चार वेळा केल्याने नेल एक्सटेंशन चांगले चिकटतील.

आवडता रंग लावा

आता तुम्ही तुमच्या नखांवर तुमचा आवडता जेल टॉप कलर कोट लावू शकता. नंतर, नेल एक्स्टेंशन सेट होण्यासाठी 60 सेकंदांसाठी यूवी लॅम्पमध्ये ठेवा. यानंतर, तुम्ही तुमच्या हव्या त्या डिझाइनचा आणि गिल्टर्सचा वापर करून एक्सटेंशनला परफेक्ट लुक देऊ शकता.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना