लाईफ स्टाइल

नॉनव्हेज खाणं चांगलं की वाईट, जाणून घ्या फायदे अन् तोटे

Published by : Saurabh Gondhali

गेल्या दशकभरात मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करणाऱ्या किंवा आहारातून असे पदार्थ पूर्णच वगळणाऱ्या माणसांची संख्या वाढते आहे. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडममधील शाकाहारीच लोकांची संख्या 2006 ते 2018 या वर्षांमध्ये चौपट झाल्याचे द व्हेगन सोसायटी या संस्थेच्या अभ्यासातून समोर आलं.सर्वसाधारणतः मांसाहारापेक्षा शाकाहारामध्ये फायबर जास्त असतं आणि कोलेस्टेरॉल, प्रथिनं, कॅल्शिअम व मीठ कमी असतं, असं मानलं जातं. पण मांस, मांसे, अंडी व दुग्धजन्य पदार्थ आपल्या आहारामधून पूर्णतः वगळण्यासंदर्भात आजही काही गैरसमजुती असल्याचं दिसून येतं. (veg non veg)

शाकाहारामधून आपल्याला व्हिटॅमिन बी-12 पुरेशा प्रमाणात मिळतं का, हा एक सर्वसाधारण चिंतेचा मुद्दा असल्याचं दिसतं. मज्जातंतूंचे नुकसान थोपवण्यासाठी बी-12 उपयुक्त असतं, आणि ते मांस, मासे, अंडी व दुग्धजन्य पदार्थांमध्ये सापडतं; फळं किंवा भाज्या यांमध्ये हे व्हिटॅमिन नसतं. प्रौढ व्यक्तीने दर दिवशी 1.5 मायक्रोग्रॅम बी-12 व्हिटॅमिन खाणं अपेक्षित असतं.

मांसाहार करणाऱ्या लोकांच्या तुलनेत शाकाहारी लोकांमध्ये दर हजार व्यक्तींमागे हृदयविकाराचे रुग्ण दहाने कमी होते आणि पक्षाघाताचे रुग्ण तीनने जास्त होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात न्यूट्रिशनल एपिडेमिऑलॉजिस्ट असणाऱ्या टॅमी टाँग म्हणतात त्यानुसार, रक्तस्त्रावामुळे होणाऱ्या आघाताचा धोका वाढण्याला विविध कारणे असू शकतात.

व्हेगन आहार इतर आहारांच्या तुलनेत अधिक आरोग्यदायी असतो का, याबद्दल ठोस निष्कर्ष काढायला आणखी संशोधन होणं गरजेचं आहे. विशेषतः अशा आहाराच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आणखी आकडेवारी मिळवणं गरजेचं आहे.दरम्यान, फळं व भाज्या यांचं जास्त प्रमाण, बी-१२चं वाढीव प्रमाण असलेले पूरक पदार्थ आणि कमी प्रमाणात व्हेगन जंक फूड, असा व्हेगन आहार सर्वोत्तम ठरेल, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Malegaon Blast Case : 'PM मोदींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले'...साध्वी प्रज्ञा यांचा खळबळजनक वक्तव्य

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी