Jaifal Benefits  Team Lokshahi
लाईफ स्टाइल

आला हिवाळा! आहारात करा जायफळाचा समावेश; आहेत आश्चर्यकारक फायदे

विशेष म्हणजे गोडाच्या पदार्थांमध्ये जायफळाचा जास्त वापर केला जातो. लहान मुलांना सर्दी, अपचन आणि पोटाच्या समस्येवर देखील जायफळ खूप गुणकारी आहे.

Published by : shamal ghanekar

जायफळाचा सुंगध खूप छान असतो. तसेच जायफळमुळे पदार्थांचीही चवीला छान होतो. विशेष म्हणजे गोडाच्या पदार्थांमध्ये जायफळाचा जास्त वापर केला जातो. लहान मुलांना सर्दी, अपचन आणि पोटाच्या समस्येवर देखील जायफळ खूप गुणकारी आहे. जायफळचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. जायफळ लहान मुलांनासाठी खूप गुणकारी आहे. तर चला जाणून घेऊया.

जायफळ खाण्याचे फायदे :

  • लहान मुलांना सर्दीच्या समस्या जाणवत असेल तर जायफळ खायला देऊ शकता त्यामुळे त्यांना आराम मिळतो. जायफळचे सेवन केल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. खोकला झाल्यावर तुम्ही जायफळ बारीक करून ते मधात मिक्स करून ते चाटण्यासाठी मुलांना द्या.

  • अनेकांनाच अपचनाच्या समस्या जाणवत असतात. त्यामध्ये लहान मुलांनाही अपचनाची समस्या जाणवत असते. त्यामुळे लहान मुलांना जायफळ खायला द्या. लहान मुलांना जर पोटदुखीची समस्या जाणवत असेल तर जायफळामध्ये मधात मिसळून द्या. त्यामुळे त्यांना आराम मिळेल.

  • जर लहान मुलांना कान दुखीची समस्या जाणवत असेल तर तुम्ही त्यांना जायफळ देऊ शकता. कारण जायफळमध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे कानदुखी दूर होते.

  • लहान मुलांसाठी जायफळ खूप महत्त्वाचे असते. दुधात जायफळ टाकून ते मुलांना प्यायला द्या. ज्यामुळे मुलांना जास्त भूक लागते. आणि त्यांची प्रतिकारशक्ती चांगली होते. जायफळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा